म. गांधी यांच्या पणतीला फसवणुकीच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

म. गांधी यांच्या पणती आशिष लता रामगोबिन

नवी देहली – म. गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेत रहाणार्‍या ५६ वर्षांच्या आशिष लता रामगोबिन या पणतीला ६० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. स्वत: ला व्यावसायिक म्हणून घेत लता यांनी स्थानिक व्यावसायिकाकडून ६० लाख रुपये हडपले. प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची ती मुलगी आहे.