कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचे पुरावे नाहीत ! – एम्स रुग्णालय

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोनाचा मुलांना अल्प प्रमाणात संसर्ग झाला. यामुळे आतापर्यंत तरी असे वाटत आहे की, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना संसर्गित करणार नाही. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत लहान मुले कोरोनाने प्रभावित झालेली नाहीत.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविरोधात लढण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घ्यावा ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने ‘ऑनलाईन अधिवक्ता परिसंवाद’!

जयजीत सिंह ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त !

राज्य आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना अपर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती मिळाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तांची जागा रिकामी होती.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होणार्‍या उपक्रमांत सहभागी होऊन गुरुप्राप्तीचे ध्येय ठेवून साधनेचे प्रयत्न वाढवूया ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील साधक, ‘सनातन प्रभात’चे वाचक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणार्‍या मुंबईकरांकडून ५५ कोटींचा दंड वसूल !

आतापर्यंतच्या सरकारांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच हा परिणाम !

कोरोनातून बरे झालेल्या १३ मुलांना ‘मीस’ आजाराने ग्रासले !

कोरोना होऊन गेलेल्या लहान मुलांना ‘मल्टिसिस्टिम इफ्लेमॅटरी सिंड्रोम’ (मीस) आजाराची लागण होत आहे. सध्या या आजाराचे १३ रुग्ण येथील घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. २ मासांत या आजाराने ग्रासलेल्या १०० मुलांवर शहराच्या विविध रुग्णालयांत उपचार झाले.

गंगेतून वाहून आलेल्या सहस्रो प्रेतांविषयी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत व्यक्त करावे, अशी अपेक्षा होती !

गंगा नदीच्या प्रवाहात सहस्रो प्रेते वाहून आली. हा विषय हिंदुत्वाचा होता. राम मंदिराइतकाच महत्त्वाचा होता. त्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत व्यक्त करावे, अशी आमची अपेक्षा होती,..

कोरोनासह महाराष्ट्रावर आता ‘म्युकरमायकोसिस’चे संकट !

कोरोनाच्या महामारीतून राज्य सावरत असतांना आता ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य रोगाचे प्राबल्य राज्यात वाढत आहे. राज्यातील या रुग्णांची संख्या २ सहस्र २४५ वर पोचली असून या रोगामुळे आतापर्यंत राज्यातील २५ जणांचा मृत्यू झाला आहे.