नवी देहली – कोरोनाच्या दुसर्या लाटेत कोरोनाचा मुलांना अल्प प्रमाणात संसर्ग झाला. यामुळे आतापर्यंत तरी असे वाटत आहे की, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना संसर्गित करणार नाही. पहिल्या आणि दुसर्या लाटेत लहान मुले कोरोनाने प्रभावित झालेली नाहीत. त्यांना लसही दिलेली नाही. यामुळे ते तिसर्या लाटेत सर्वाधिक संसर्गित होतील, याचे काही पुरावे मिळालेले नाहीत, असे देहलीतील ‘एम्स’ रुग्णालयाचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
AIIMS Director Randeep Guleria says there is no conclusive evidence that the third wave of covid will impact children severely.@Runjhunsharmas shares more details pic.twitter.com/IprwByA8ul
— News18 (@CNNnews18) May 24, 2021