राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करून भाजपकडून बंगालमधील हिंसाचाराचा निषेध !

मुंबई – बंगालमधील निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार घडवून आणला. भाजपच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करून हिंसाचाराचा निषेध करण्यात आला. नागपूर येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुणे येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, बीड येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक धरून ममता बॅनर्जी यांचा निषेध केला.