सावंतवाडी कुटीर रुग्णालयात कोरोनाची लस देतांना कोरोना योद्धा असलेल्या पालिका कर्मचार्‍यांना प्राधान्य दिले नाही ! – माजी आरोग्य सभापती परिमल नाईक

हा प्रकार योग्य नाही. कोरोना काळात पालिका सफाई कर्मचारी, आरोग्यसेवक, यांनी ज्या पद्धतीने कामे केली, त्यामुळे आपण शहरात मोठया प्रमाणात कोरोनावर मात करू शकलो.

ओमकार ग्रूपच्या अध्यक्षांना अटक

ओमकार बिल्डरच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकून अध्यक्ष कमल गुप्ता आणि संचालक बाबूलाल वर्मा यांना अटक केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कातरणी ग्रामपंचायतीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रहित

कातरणी ग्रामपंचायतीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रहित करण्यात आली आहे.

सरसंघचालक मोहनजी भागवत ३१ जानेवारीला तपोभूमीला भेट देणार

सरसंघचालक मोहनजी भागवत सध्या गोवा दौर्‍यावर आहेत. सरसंघचालक मोहनजी भागवत ३१ जानेवारी या दिवशी कुंडई येथील श्रीक्षेत्र तपोभूमीला भेट देणार आहेत.

लोणंद (जिल्हा सातारा) येथे अज्ञात वाहनाने ३ जणांना चिरडले !

लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ २८ जानेवारीला सकाळी ६ वाजता एकाच कुटुंबातील सदस्य फिरायला निघाले होते. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २ जण जागीच ठार झाले, तर १ जण गंभीर घायाळ झाला आहे.

१ फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वेसेवा चालू होणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

शासनाच्या नियमानुसार मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापने रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येतील.

अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले !

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी, म्हणजेच उद्यापासून शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार होते.

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबईत ५ नवीन सायबर पोलीस ठाणी

सायबर गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी, तांत्रिक साहाय्यासाठी पोलिसांना तसेच तक्रारदारांना गुन्हे शाखेच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील सायबर पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागत होते.

वेंगुर्ला येथील नगरवाचनालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

साहित्यिक, व्यासंगी वाचक पुरस्कार, विविध स्पर्धांचे आयोजन करून प्रत्यक्ष वाचन चळवळ बळकट करत आहेत, असे प्रतिपादन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त वीरधवल परब यांनी ग्रंथप्रदर्शनाच्या शुभारंभी केले.

धनंजय मुंडे आणि त्या महिलेचा वाद मध्यस्थांच्या वतीने मिटवण्यात येणार

मुंडे आणि महिला यांच्या वतीने न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्यासमोर परस्पर सहमतीची सूत्रे सादर करण्यात आली.