अपेक्षा न करता साधना करत रहायचे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सौ. सुवर्णा पेठकर : ‘मला ‘साधनेमध्ये स्थिर रहायला हवे. साधना अंतर्मनापासून सातत्याने व्हावी’, असे वाटते; परंतु कधी कधी माझी बहिर्मुखता असते.

सौ. सुवर्णा पेठकर

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो; पण त्याला कित्येक मास किंवा वर्षेही लागतात. ‘जेवले की, लगेच पाेट भरते’, तसे इथे होत नाही. ‘स्वयंसूचना दिल्या की, आपले सगळे दोष गेले’, असे होत नाही. त्यासाठी अधिक वेळ लागतो . हे लक्षात ठेवून स्थिरतेने साधना करत रहायचे. अपेक्षा करायची नाही. काही प्रसंग घडले की, ‘त्यावर सूचना कोणत्या द्यायच्या?’ हे कळत नसेल, तर पुढे विचारून घ्यायचे.’