शासन गोवा मुक्तीदिन सोहळ्यावर ३ कोटी १० लाख रुपये खर्च करणार ! – काँग्रेस

स्वातंत्र्यसैनिकांच्या बलीदानाचा कुणीही गैरलाभ उठवू नये.

अन्य धर्मियांनी मंदिरात प्रवेश केल्यावर आभाळ कोसळणार आहे का ? – कर्नाटक उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, देशात राज्यघटना नावाची गोष्ट अस्तित्वात आहे. आम्ही अशा याचिकेवर विचार करू शकत नाही जी आम्हाला १०० वर्षे मागे नेईल.

केंद्र सरकारने कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा विचार करावा ! – सर्वोच्च न्यायालय

आम्ही निष्पक्ष आणि स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा विचार करत आहोत. या समितीमध्ये कृषीक्षेत्राशी निगडित तज्ञ आणि शेतकरी संघटना यांचे प्रतिनिधी असतील. तोडगा निघेपर्यंत केंद्र सरकारने तिन्ही कायद्यांना स्थगिती देण्याचा विचार करावा.

आक्षेपार्ह मजकूर नसल्याने बजरंग दलाच्या फेसबूक खात्यावर बंदीची आवश्यकता नाही ! – फेसबूक इंडिया

तथ्यशोधक गटाला बजरंग दलाच्या फेसबूकच्या खात्यावर कोणतेही आक्षेपार्ह लिखाण किंवा सामग्री आढळलेली नाही. त्यामुळे त्याच्या फेसबूक खात्यावर बंदी घालण्याची आवश्यकता नाही, असे ‘फेसबूक इंडिया’कडून सांगण्यात आले.

(म्हणे) ‘धर्माच्या नावाखाली देशात फूट पाडू दिली जाणार नाही !’ – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे फुकाचे बोल

बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शेख हसीना प्रत्यक्षात काय कृती करत आहेत ? हिंदूंचे रक्षण कसे करत आहेत ? हिंदूंच्या संघटनांना त्या कसे संरक्षण देत आहेत? हेही त्यांनी सांगायला हवे अन्यथा ही केवळ भाषणबाजीच ठरील !

केरळमधील ख्रिस्त्यांचा हलाल मांसाला विरोध

नाताळच्या काळात हलाल मांसावर बहिष्कार घालण्याचा निर्णय केरळमधील ख्रिस्त्यांनी घेतला आहे. ‘येशूच्या जन्मदिनी हलाल मांस का खावे ?’ असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

इस्रोच्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण

कोरोनाच्या काळातही इस्रोने हा दुसरा उपग्रह प्रक्षेपित केले आहे. ‘हा उपग्रह चांगल्या प्रकारे काम करत असून पुढील चार दिवसांत तो अवकाशातील नियोजित स्थळी पोचून कार्यरत होणार आहे’, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

‘बिग बॉस’मधून मनोरंजन नाही, तर केवळ मानसिक त्रास होतो  ! – अभिनेत्री शमिता शेट्टी  

असे कार्यक्रम भारतात प्रसारित होतात आणि कोट्यवधी लोक ते पहातात; मात्र  काही ठरावीक समाजप्रेमी वगळले, तर कुणीही त्याचा विरोध करत नाही, हे भारतियांना लज्जास्पद !

महाराष्ट्रात पुलांच्या कामांमधील नियमबाह्यतेमुळे अर्थसंकल्प कोलमडला !

रस्ते विकासासाठी नियोजन करून आणि आराखडे बनवूनही, तसेच त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पुरवूनही त्यांची कामे वेळेत पूर्ण होत नसतील, तर संबंधित अधिकार्‍यांना याचा जाब विचारायला हवा !

शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ संकेतस्थळावरील माहिती आवेदनात ‘ब्राह्मण – ब्राह्मणेतर’ असा उल्लेख

शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ संकेतस्थळावर शालेय विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात येते. पूर्वी या माहिती आवेदनात सर्व जातींचा उल्लेख होता; परंतु आता त्या आवेदनात ‘ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मणेतर’ असा उल्लेख आढळला आहे.