इस्रोच्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण

आपत्ती व्यवस्थापनासाठी साहाय्य होणार

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने १७ डिसेंबर या दिवशी भारताचा ४२ वा संप्रेषण उपग्रह येथील प्रक्षेपक केंद्रावरून अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि इंटरनेट कनेक्टिव्हीटी यांसाठी साहाय्य करणार आहे.

कोरोनाच्या काळातही इस्रोने हा दुसरा उपग्रह प्रक्षेपित केले आहे. ‘हा उपग्रह चांगल्या प्रकारे काम करत असून पुढील चार दिवसांत तो अवकाशातील नियोजित स्थळी पोचून कार्यरत होणार आहे’, अशी माहिती इस्रोने दिली आहे.