बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शेख हसीना प्रत्यक्षात काय कृती करत आहेत ? हिंदूंचे रक्षण कसे करत आहेत ? हिंदूंच्या संघटनांना त्या कसे संरक्षण देत आहेत? हेही त्यांनी सांगायला हवे अन्यथा ही केवळ भाषणबाजीच ठरील !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदु, मुसलमान, बौद्ध आणि ख्रिस्ती यांचाही मोठा सहभाग होता. आता धर्माच्या नावाखाली देशात फूट पाडू दिली जाणार नाही. देश समृद्धी आणि विकास यांच्या दिशेने वाटचाल करत आहे. धार्मिक सद्भावना कायम ठेवणे आवश्यक असून त्याविना विकासाच्या मार्गावर चालता येणार नाही. आपल्या धार्मिक मूल्यांचा स्तर कशा प्रकारे टिकवायचा आणि देशाला विकासाच्या मार्गावर कसे नेले पाहिजे, याचा विचार करण्याची अधिक आवश्यकता आहे, असे प्रतिपादन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केले.
शेख हसीना पुढे म्हणाल्या, ‘‘बांगलादेशमध्ये सर्वच धर्मांच्या नागरिकांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याची मुभा आहे; मात्र देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या धर्मांधतेला थारा देणार नाही. देशातील १६ कोटी नागरिकांना शांतता आणि धार्मिक सद्भावनेने रहाण्याची इच्छा आहेे.’’