मुंबईवरील आतंकवादी आक्रमणातील हुताम्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले पोलीस आणि जवान यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मरीन ड्राईव्ह येथील पोलीस परेड मैदानातील स्मारकाच्या ठिकाणी पोलीस आणि जवान यांना श्रद्धांजली वाहिली

धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे १० टक्के गरीब रुग्णांना उपचार द्यावेत ! – ग्रामविकासमंत्री

शहर आणि राज्य यांतील धर्मादाय रुग्णालयांमध्ये १० टक्के गरीब रुग्णांना विनामूल्य उपचारावरील नियमांचे पालन करून उपचार द्यावेत, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

देहलीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे कृषी कायद्यांच्या विरोधात प्रखर आंदोलन

पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखल्याने आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी बॅरिकेड्स उचलून उड्डाणपुलाच्या खाली फेकून दिले. आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. देहली पोलिसांनी पाण्याचे फवारे आणि अश्रूधूर यांचा वापर केला.

तुळशीविवाहाच्या दिवशी विद्यालयांमध्ये ‘घटनादिन’ पाळण्यास सांगितल्याने शिक्षकांमध्ये अप्रसन्नता

तुळशीविवाहाच्या दिवशी घटनादिन साजरा करण्यास सांगण्यात आला. भाजपच्या राज्यात हे अपेक्षित नाही !

श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिक हुतात्मा

जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही !

वास्को येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून हुतात्मा चौकात झेंडे लावून चौकाचे विद्रूपीकरण

राष्ट्रवादी काँग्रेससारख्या राष्ट्रीय राजकीय पक्षाने याचे भान ठेवणे आवश्यक.

लेप्टोस्पायरोसिस, अतीसार, मलेरिया आणि डेंग्यू या आजारांविषयी सतर्क रहा ! – डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग

ताप, अंगदु:खी, थंडी वाजणे, स्नायूवेदना होणे, लघवी पिवळी होणे आदी लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्वरित उपचार घ्यावेत.

सिंधुदुर्ग आर्.टी.ओ. कार्यालयातील वाहन कर घोटाळा प्रकरणी ५ कर्मचारी निलंबित

भारतातील प्रत्येक क्षेत्रातील भ्रष्टाचार सर्वपक्षीय सरकारांसाठी लज्जास्पद !

बिहार विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ !

किती हिंदु लोकप्रतिनिधी संस्कृतमधून शपथ घेतात ? शकील अहमद खान यांनी संस्कृतला मृतभाषा ठरवणार्‍या काँग्रेसला संस्कृतविषयी योग्य धडा शिकवला पाहिजे !

बंगालमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक

तृणमूल काँग्रेसने भाजपचा दगडफेकीचा आरोप फेटाळला !