उत्तरप्रदेशात आता ८ वीपर्यंतचे विद्यार्थी आठवड्यातून एकदा दप्तराविना जाणार !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील सरकारी शाळांतील ८ वी पर्यंतचे विद्यार्थी आठवड्यातून एक दिवस दप्तराविना जाऊ शकणार आहेत. सरकारकडून असा निर्णय घेतला गेला आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना तणावमुक्त आणि खेळ खेळत शिक्षण दिले जाणार आहे. (तरुण पिढीला खर्‍या अर्थाने तणावमुक्त करण्यासाठी तिच्यावर साधनेचा संस्कार करून ती करवून घेणे आवश्यक आहे. – संपादक)