नवी मुंबई – सिडकोने कळंबोली येथील नियोजित मलनि:सारण पुनर्प्रक्रिया केंद्रातून (टी.टी.पी.) पुनर्प्रक्रिया केलेले ३० दशलक्ष लिटर पाणी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जगभर पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात असतांना सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी सिडकोच्या वतीने करण्यात येणारे प्रयत्न हे पाणी बचत आणि पर्यावरण यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आहेत’, असे मत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.