कंगना राणावत यांचे कार्यालय पूर्ववत करून देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश.

या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे, ‘‘कंगना यांच्या कार्यालयाच्या नुकसानीचा व्यय मुख्यमंत्र्यांच्या खिशातून करावा. या सुडाच्या राजकारणाचा भुर्दंड सरकारी तिजोरीतून कशाला ?”

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करून देशापुढे आदर्श निर्माण करावा !- राज पुरोहित, भाजपचे नेते

हिंदूंचा वंशविच्छेद करणार्‍या या षड्यंत्राचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्रातही लव्ह जिहादच्या विरोधात तत्परतेने कडक कायदा व्हायला हवा !

राजकारण म्हणून ‘हिंदुत्व’ करू नका  ! –  उद्धव ठाकरे

मुंबई महानगरपालिकेच्या भोवती आमची भक्कम तटबंदी आहे. ज्यांना लढाई करायची खुमखुमी असेल, त्यांनी डोके आपटून बघावे. मुंबई महापालिका शिवसेनेकडेच येईल-उद्धव ठाकरे

मालेगाव येथे धर्मांधाकडे गर्भपाताच्या औषधांचा अनधिकृत साठा जप्त !

पोलिसांनी या प्रकरणी आबिद आमिन या संशयित आरोपीस अटक करून आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

नवी मुंबईत चाचणी न केलेल्या व्यक्तींचे कोरोना अहवाल दिले !

कहर म्हणजे काही वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचाही कोरोनाचा पडताळणी अहवाल देण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या महाग प्रकल्पाचा फेरविचार करावा – आशिष शेलार

निःक्षारीकरणाच्या प्रकल्प उभारण्याचा आढावा घेऊन पुढील प्रक्रिया चालू करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत; मात्र हा प्रकल्प खर्चिक आहे, असे भाजपाने म्हटले आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तियाला अटक

ईडीने मंगळवारी सरनाईक यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालये अशा १० ठिकाणी धाडी टाकल्या.

कार्तिक पौर्णिमेला श्री जोतिबा देवाचे दर्शन मर्यादित भाविकांनाच !

२९ आणि ३० नोव्हेंबर या २ दिवसांत भाविकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार

पालिका प्रशासनाच्या लक्षात का आले नाही ? गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी आणि अंनिसवाले  आता कुठे आहेत ?

वणीत कापसाची आवक घटली

बोंडअळी, बोंडसड यामुळे कापसाच्या उत्पन्नात पुष्कळ घट झाली आणि त्यामुळे कापसाची आवक घटल्याचे बोलले जात आहे. कापसाच्या उत्पन्नात होत असलेली घट शेतकर्‍यांची चिंता वाढवत आहे.