मुलांची उन्हाळ्यातील पोहण्याची (स्विमिंग) शिबिरे चालू झाली आहेत, त्यात ढगाळ हवा आणि अजूनही खात असलेली द्राक्षे यांमुळे घसादुखी अन् सर्दी-खोकला प्रमाण वाढू शकेल. पोहण्याच्या तलावामध्ये भरपूर मुले एकत्र असल्याने एकमेकांचा संसर्ग व्हायची शक्यताही अधिक राहील. त्यासाठी काही सूत्रे येथे देत आहे.
१. हळद कोमट पाण्यात मिसळून त्याच्या गुळण्या आणि पोहून आल्यावर हलक्या हाताने डोळे धुणे, हे चालू करा. तलावाचे पाणी घशात जाऊन होणारी खवखव आणि डोळ्याची आग या दोन्हींवर बर्यापैकी नियंत्रण राहील.

२. पोहून झाल्यावर केस स्वच्छ पुसावेत. मोठ्या केसांना ‘माईल्ड हेअर ड्रायर’ (केस वाळवण्यासाठीचे एक यंत्र) वापरता येईल. केस कोरडे होऊ नयेत; म्हणून तेल लावावे. छाती आणि तळपाय यांना वेखंड चोळावे.
३. पोहून झाल्यानंतर व्यायाम केला की, ‘हायड्रेशन’ (शरिरातील पाण्याची पातळी राखणे) म्हणून बरेच पालक शहाळी किंवा नारळ पाणी अथवा फळांचा रस (ज्यूस) देतात, ते टाळावे.
पोहून झाल्यानंतर खायला गरम आणि ताजे असे पोहे, उपमा, घावन, दलिया, पोळी रोल, पराठा, उकडलेले अंडे, खजूर, सुके अंजीर, असे देता येईल. वैद्यांकडून एखादे प्रतिदिन घेण्यासाठी चाटण घेतले, तर सर्दी, खोकला उद्भवत नाही. त्यातून आपल्या पाल्याची प्रकृती असल्याने पटकन त्रास झालाच, तरी तापापर्यंत न जाता पटकन आटोक्यात येतो, हा आजवरचा माझा अनुभव !