बाजारातील पनीर खाण्यापेक्षा घरी केलेले पनीर खा !

गेले काही दिवस ‘भारतातील पनीरमधील भेसळ’ यावर इंटरनेटवर बर्‍याच चर्चा चालू आहेत. शाकाहारी आहारातील ‘प्रोटीन्स’चा (प्रथिनांचा) उत्तम स्रोत म्हणून पनीरकडे पाहिले जाते; पण देशातील बहुसंख्य पनीर हे भेसळयुक्त असल्याचे जागोजागी दिसत आहे. युरिया, फॉर्मेलिन, स्टार्च आणि अन्य कित्येक रसायने घालून हे पनीर बनवले जात आहे.

वैद्य परीक्षित शेवडे

आयुर्वेदानुसार नियमित व्यायाम करणार्‍या व्यक्तींनी कधी तरी पनीर खायला काही हरकत नाही. त्यांच्या पोषणासाठी ते उपयुक्त ठरते. व्यायाम न करणार्‍या व्यक्तींनी मात्र त्यापासून शक्यतो दूर रहाणे उत्तम. त्यातही पचनाचे विकार, वारंवार पोट बिघडणे, काहीही खाल्ल्यावर शौचाला जाण्याची भावना होणे असे त्रास असणार्‍यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यातही आताचे अहवाल पहाता एकूणच बाजारातील पनीरपासून दूर रहाण्यात शहाणपण आहे.

माझ्या रुग्णांना गेल्या किमान ५ वर्षांपासून मी ‘बाजारातील पनीर खाऊ नका’, असे सांगत आलो आहे. पनीर खायचेच असेल, तर घरच्या घरी लिंबू रसाने दूध फाडून सिद्ध करून खा. त्यातही घरी केलेले असले, तरी रात्रीच्या जेवणात पनीर शक्यतो टाळा. नियमित व्यायाम करणार्‍यांनीही पनीर हा नित्यनेमाने प्रतिदिन अमुक एक ग्रॅम असा नियमित खाण्याचा पदार्थ नाही, हे लक्षात घ्या !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.