आमची उमेदवारांची सूची सिद्ध आहे ! – इम्तियाज जलील, नेते, एम्.आय.एम्.

काँग्रेसचे नाना पटोले, अमित देशमुख यांच्यासमवेत चर्चा झाली होती. युती असल्याने आम्ही चर्चा करू, असे ते म्हणाले होते; पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता सगळे संपले आहे. आमचीही सूची सिद्ध आहे, असे विधान पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील मध्य मतदारसंघात तिरंगी लढत होणार !

छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे किशनचंद तनवाणी आणि ‘एम्.आय.एम्.’चे नासेर सिद्दिकी अशी तिरंगी लढत होणार आहे.

लव्ह जिहाद म्हणजे जाळ्यात अडकवणे ! – अधिवक्त्या वर्षा डहाळे

अधिवक्त्या वर्षा डहाळे म्हणाल्या की, काही काळापूर्वी केरळमधील हिंदु मुली मोठ्या संख्येने गायब झाल्या. कालांतराने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून सक्तीचे धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचे लक्षात आले.

नांदेड जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे २ सौम्य धक्के !

२ वेळा भूगर्भातून आवाज येऊन सौम्य हादरे जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राने दिली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे १.५ आणि ०.७ अशी नोंदवण्यात आलेली आहे.

वर्षभरात ७१ जणांनी पुणे महापालिकेची नोकरी सोडली !

पालटलेली कार्यपद्धत, आरोग्याच्या समस्या, कामाचा ताण यांमुळे १३ जणांनी स्वीकारली स्वेच्छानिवृत्ती !

कोल्हापूर उत्तर भागाची उमेदवारी ज्याला घोषित होईल, त्यांचा प्रचार करणार ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापूर उत्तर भागाच्या निवडणुकीच्या संदर्भात बर्‍याच अफवा पसरवल्या जात आहेत. कृष्णराज महाडिक यांच्या संदर्भात गैरसमज निर्माण होऊ नये; म्हणून हा खुलासा करत आहे.

श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी १ कोटी १४ लाख रुपयांची देणगी !

यंदा दर्शनासाठी उच्चांकी १८ लाख भाविकांची नोंद झाली होती. यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या १२ दानपेट्यांमधून १ कोटी १४ लाख ४३ सहस्र २१० रुपयांची देणगी जमा झाली.

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : नायजेरीयन नागरिकाची आत्महत्या !…बँकेला टाळे ठोकणार्‍या ग्राहकावर गुन्हा नोंद !

इमारतीच्या १५ व्या माळ्यावरून उडी मारून अर्नेस्ट ओबीरथ या ४२ वर्षांच्या नायजेरीयन नागरिकाने आत्महत्या केली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला.

आदिवासी तरुणांची पोलीस भरती शक्य !

राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये आदिवासी उमेदवारांना ५ सेंटीमीटर उंचीची सवलत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यामुळे आता आदिवासी तरुणही पोलीस होऊ शकतात.

छत्रपती संभाजीनगर येथे चांगला स्वयंपाक येत नसल्याने विवाहितेचा छळ !

हिंगोली येथील महिला दक्षता समितीने दांपत्याचे म्हणणे ऐकून तडजोडीचा प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. त्यामुळे विवाहितेने तक्रार प्रविष्ट केली.