लव्ह जिहाद म्हणजे जाळ्यात अडकवणे ! – अधिवक्त्या वर्षा डहाळे

‘स्त्री शक्ती फाऊंडेशन’च्या वतीने व्याख्यान

पिंपरी (पुणे) – लव्ह जिहादचे संकट तुमच्या-आमच्या घरापर्यंत पोचले आहे. लव्ह जिहाद म्हणजे प्रेम नसून केवळ प्रेमाच्या जाळ्यात अडकवून सक्तीचे धर्मांतर आहे, असे प्रतिपादन अधिवक्त्या वर्षा डहाळे यांनी केले. चिंचवड येथे महिलांनी महिलांसाठी निर्माण केलेले खुले व्यासपीठ म्हणजे ‘स्त्री शक्ती फाऊंडेशन’च्या माध्यमातून आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.

अधिवक्त्या वर्षा डहाळे म्हणाल्या की, काही काळापूर्वी केरळमधील हिंदु मुली मोठ्या संख्येने गायब झाल्या. कालांतराने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून सक्तीचे धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचे लक्षात आले. हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढण्यापूर्वी संबंधित मुलींचा आर्थिक स्तर, कौटुंबिक पार्श्वभूमी प्रथम समजून घेतली जाते, त्यानंतर संबंधित मुलीची काही काळ रेकी केली जाते. तिच्या सवयी जाणून घेतल्या जातात, त्यानंतर आर्थिक स्तरावर आमीष दाखवून तिला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे सक्तीने धर्मांतर केले जाते. वैद्यकीय क्षेत्र, न्यायदान करणारी महिला, आय.ए.एस्.ची सिद्धता करणारी तरुणी अशा सर्वच क्षेत्रांतील मुलीही फसत चालल्याने हे गंभीर आहे.