मुंबई – राज्यात अल्पसंख्याकांचा पाठिंबा असलेला एम्.आय.एम्. पक्ष महाविकास आघाडीसमवेत जागावाटपासाठी प्रयत्न चालू करत होता. आम्ही महाविकास आघाडीसमवेत चर्चा केली, पत्र लिहिले; पण आता आमचे जिथे विद्यमान आमदार आहेत, तिथे महाविकास आघाडीने मुसलमान उमेदवार दिले आहेत. काँग्रेसचे नाना पटोले, अमित देशमुख यांच्यासमवेत चर्चा झाली होती. युती असल्याने आम्ही चर्चा करू, असे ते म्हणाले होते; पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता सगळे संपले आहे. आमचीही सूची सिद्ध आहे, असे विधान पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी केले आहे.
‘भिवंडी, मालेगाव, मुंब्रा यांसारख्या १५ हून अल्प जागाच आम्ही मागितल्या होत्या; पण त्यांनी जागेविषयी काहीही कळवले नाही. आता मी ओवैसी यांच्या आदेशाची वाट पहात आहे. ते सांगतील त्या जागा आम्ही लढवणार आहोत’, असेही जलील म्हणाले.