कोल्हापूर – नवरात्रोत्सवाच्या कालावधीत श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी भाविकांनी दानपेटीत अर्पण केलेल्या रोख रकमेची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. यंदा दर्शनासाठी उच्चांकी १८ लाख भाविकांची नोंद झाली होती. यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या १२ दानपेट्यांमधून १ कोटी १४ लाख ४३ सहस्र २१० रुपयांची देणगी जमा झाली. गेल्या ३ दिवसांपासून ही मोजणी चालू होती. यासाठी ३५ कर्मचारी कार्यरत होते. ही मोजणी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आणि श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.