मुंबई – राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये आदिवासी उमेदवारांना ५ सेंटीमीटर उंचीची सवलत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यामुळे आता आदिवासी तरुणही पोलीस होऊ शकतात.
पोलीस भरतीमध्ये उंचीच्या अटीमुळे आदिवासी तरुणांना काही समस्या येत होत्या. काही दिवसांपूर्वी केळापूर-आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन आदिवासी उमेदवारांना उंचीमध्ये ५ सेंटीमीटरची सवलत देण्याची मागणी करण्यात आली होती.