पालटलेली कार्यपद्धत, आरोग्याच्या समस्या, कामाचा ताण यांमुळे १३ जणांनी स्वीकारली स्वेच्छानिवृत्ती !
पुणे – पुणे महापालिकेपेक्षा अन्य चांगल्या ठिकाणी नोकरी मिळत असल्याने गेल्या वर्षभरात ७१ जणांनी नोकरी सोडली आहे, तर पालटलेली कार्यपद्धत, आरोग्य आणि कामाच्या ताण यांमुळे १३ जणांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे.
महापालिकेत लिपिक, कनिष्ठ अभियंता, फायरमन, साहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, विभागीय वैद्यकीय अधिकारी यांसह अन्य काही पदांवरील अधिकार्यांनी राजीनामा दिल्याने ७१ जागा पुन्हा रिक्त झाल्या. महापालिकेत नोकरभरतीची प्रक्रिया पारदर्शी करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आव्हानात्मक आहे.