नंदुरबार शहरातील उघड्यावरील मांस विक्री कायमस्वरूपी बंद करण्याची हिंदु सेवा साहाय्य समितीची मागणी

का पिसाळलेल्या कुत्र्याने वीर सावरकर नगर येथील पाच वर्षीय कु. हिताक्षी मुकेश माळी हिचा चावा घेतल्याने तिचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. कामात कुचराई करणार्‍या संबंधित स्वच्छता ठेकेदाराचा ठेका रहित करावा, मांस विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून उघड्यावरील मांस विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी…

जातीव्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडायला सिद्ध आहोत ! – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे आहे. आर्थिक निकषावरील आरक्षणाला आमचा विरोध आहे. सगळेच आरक्षण आर्थिक निकषावर देता येत नसल्याने जातीच्या आधारावर आरक्षण आहे. त्यामुळे जाती व्यवस्था संपवा. आम्ही आरक्षण सोडायला सिद्ध आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे स्थानांतर तात्काळ रहित करण्याची मागणी

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले आहे. त्यांच्या काळात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती, तसेच नियमानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांचे स्थानांतर ३ वर्षे करता येत नाही.

बंगालमध्ये भारत मातेच्या पूजेच्या आयोजनाची भित्तीपत्रके लावणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण

‘बंगाल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मार खाण्याचे ठिकाण’, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये ! केंद्रात भाजपचे सरकार असतांना बंगालमधील तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी मोडून काढण्याचा प्रयत्न अद्यापपर्यंत होणे अपेक्षित होते, असेच हिंदूंना वाटते !

कुजिरा, बांबोळी संकुलातील शिक्षिका कोरोनाबाधित : विद्यालयाचे नियमित वर्ग रहित

कुजिरा, बांबोळी संकुलातील ‘मुष्टीफंड विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय’मधील एक शिक्षिका कोरोनाबाधित झाली आहे. यामुळे विद्यालयाचे इयत्ता १० आणि १२ वीचे नियमित वर्ग १२ डिसेंबरपर्यंत रहित करण्यात आले आहेत.

कणकवली शहरात अज्ञाताने लावलेल्या आगीत २ दुचाकी जळल्या, तर एका दुचाकीची अंशतः हानी

शहरातील नागवे रोड येथील संजय ढेकणे यांच्या घराजवळ रस्त्यालगत उभ्या करण्यात आलेल्या ३ दुचाकी जाळण्याचा प्रयत्न ९ डिसेंबरला पहाटे अज्ञाताने केला. यामध्ये २ दुचाकी जळून खाक झाल्या, तर १ दुचाकी वाचवण्यात स्थानिकांना यश आले.

फ्रान्समध्ये शिक्षकाचा शिरच्छेद करणार्‍या धर्मांधांच्या मृतदेहाची त्याच्या चेचन्या येथील गावी काढण्यात आली अंत्ययात्रा !

मुसलमानबहुल चेचन्यामध्ये कोणत्या मानसिकतेचे लोक आहेत, हे लक्षात येते ! जगात असे किती ठिकाणे आहेत, याचा विचार करून त्यांना बहिष्कृत करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

सिंधुदुर्गात अचानक पडलेल्या पावसाने आंबा आणि काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ डिसेंबरला काही ठिकाणी अचानक पाऊस पडला. सकाळपासूनच वातावरणात पालट जाणवत होता, तसेच उष्णताही वाढली होती. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

‘आयुष’ मंत्रालयांतर्गत येणार्‍या औषधांना प्रोत्साहन दिल्याने अ‍ॅलोपॅथीवर  परिणाम होत असल्याचा गोव्यातील डॉक्टरांचा दावा !

केंद्रशासनाने ‘आयुष’ मंत्रालयांतर्गत येणार्‍या औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांना गोव्यातील डॉक्टरांनी विरोध दर्शवला आहे. केंद्राच्या या प्रयत्नांचा निषेध करणारे एक निवेदन ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या गोवा विभागाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले आहे.

बांगलादेशातील शरणार्थी रोहिंग्यांचे बंगालच्या खाडीतील बेटावर स्थलांतर !

भारतातील घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशी यांनाही भारताने या बेटावर पाठवून द्यावे, अशी कुणी मागणी केल्यास त्यात चुकीचे काय ?