सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ डिसेंबरला काही ठिकाणी अचानक पाऊस पडला. सकाळपासूनच वातावरणात पालट जाणवत होता, तसेच उष्णताही वाढली होती. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अचानक पाऊस पडला. वेंगुर्ले, बांदा, सावंतवाडी आणि कणकवली यां शहरांसह जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा आला. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने बर्याच ठिकाणी धुळीचे वातावरण निर्माण झाले आहे, मात्र अचानक आलेल्या पावसाने आता मार्गावर आता चिखल झाला. सध्या थंडी पडत असल्याने आंबा आणि काजू झाडांना चांगला मोहोर आला आहे; मात्र अचानक पडलेल्या पावसाने आंबा आणि काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.