अशी विकृत मानसिकता असलेल्यांना शोधून कठोर शिक्षा होणे आवश्यक !

कणकवली – शहरातील नागवे रोड येथील संजय ढेकणे यांच्या घराजवळ रस्त्यालगत उभ्या करण्यात आलेल्या ३ दुचाकी जाळण्याचा प्रयत्न ९ डिसेंबरला पहाटे अज्ञाताने केला. यामध्ये २ दुचाकी जळून खाक झाल्या, तर १ दुचाकी वाचवण्यात स्थानिकांना यश आले.
गाड्यांना लागलेल्या आगीने ढेकणे यांना जाग आली. त्यांनी पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत २ दुचाकी जळून खाक झाल्या, तर एक दुचाकी वाचवण्यात यश आले.
यापूर्वीही कणकवली शहरात गाड्यांना आग लावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे असे प्रकार नेमके कोण आणि कशासाठी करतो ? असा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकारामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !