त्राल येथे आतंकवाद्यांच्या ग्रेनेड आक्रमणात ८ जण घायाळ
आतंकवाद्यांचा कायमचा नायनाट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
लाल मुंग्यांची चटणी कोरोनावरील उपचारांत वापरता येऊ शकते का ?
आदिवासी लोक लाल मुंग्यांचा वापर ताप, सर्दी-खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि अन्य आजारांवर उपचार म्हणून करतात.
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा निष्कर्ष मुंबई पोलिसांप्रमाणेच असेल ! – परमवीर सिंग, पोलीस आयुक्त, मुंबई
‘‘काही जण मुंबई पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी यांची अपकीर्ती करण्याचे काम करत आहेत; मात्र आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत.’’
यवतमाळ येथून पळून गेलेल्या धर्मांध आरोपीला नागपूर येथे अटक !
जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पळून गेलेल्या शेख जमील उपाख्य जम्या जब्बार शेख (वय २४ वषर्े) या धर्मांध आरोपीला बाभुळगाव पोलिसांनी नागपूर येथे अटक केली.
विनामास्क ३१ डिसेंबर साजरा करणार्यांवर कारवाई
३१ डिसेंबर साजरा करतांना विनामास्क असणार्या १३ सहस्र १७९ जणांवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. या कारवाईत २६ लाख ३५ सहस्र ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शेतकर्याला महावितरणने ५ सहस्र १४८ रुपये भरपाई आणि वीज जोडणी त्वरित देण्याचा ग्राहक तक्रार निवारण मंचचा निकाल
वीज वितरण सारख्या आस्थापनाने निधी नसल्याने जोडणी देता येत नाही, असे सांगणे हास्यास्पद आहे. असे असेल तर घेतलेल्या अनामत रकमेचे काय केले, तेही आस्थापनेने सांगितले पाहिजे.
अंबरनाथ येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त श्री. विनायक जोशी यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले.
पोलंडमध्ये शवपेट्यांच्या विज्ञापनामध्ये अर्धनग्न मॉडेल्सच्या वापरावरून चर्चकडून टीका
शवपेट्यांच्या विक्रीसाठी अशा प्रकारचे विज्ञापन करण्याची कल्पना ही केवळ विकृतीमुळेच सुचू शकते ! पाश्चात्त्यांमध्ये नैतिक मूल्यांचा किती अभाव आहे, हेच यातून लक्षात येते; मात्र तरीही भारतीय पाश्चात्त्यांना आदर्श समजतात !
बांगलादेशने १ सहस्र ७७६ शरणार्थी रोहिंग्यांची केली बेटावर रवानगी !
हे बेट भूभागापासून ३४ कि.मी.वर अंतरावर आहे. हे बेट पावसात नेहमी बुडून जात असल्याने बांगलादेशने बेटावर तटबंदी केली आहे. यासह तेथे घरे, रुग्णालये, मशिदीही बांधल्या आहेत.