
अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने साजरा करण्यात येणारा श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४३ वा पुण्यतिथी उत्सव ९ मे या दिवशी आहे, मात्र कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन आदेशाचे पालन करीत दळणवळण बंदीमुळे मंदिर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवात मंदिर समितीच्या वतीने साजरे होणारे प्रभात फेरी, धर्मसंकीर्तन, पारायण सोहळा, सनई वादन, वीणा सप्ताह, भजनसेवा, प्रसाद वाटप, पालखी मिरवणूक, गोपाळकाला इत्यादी सर्व धार्मिक कार्यक्रम सलग दुसऱ्या वर्षीही रहित करण्यात आले आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.
९ मे या दिवशी पहाटे ५ वाजता पुरोहितांच्या हस्ते काकड आरती झाली. नंतर देवस्थानच्या वतीने महेश इंगळे यांच्या हस्ते श्रींना पारंपारिक लघुरुद्राभिषेक करण्यात आला. सकाळी ११ वाजता अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात आला. या प्रसंगी कोणत्याही भाविकांचा सहभाग नव्हता. स्वामी भक्तांनी आपल्या घरीच राहून पारायण, नामजप, नामस्मरण करून कोरोनामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा. संपूर्ण सृष्टीवरील मानवी जीवनावर बळावलेल्या या कोरोना नामक संकटातून श्री स्वामी समर्थ आपणा सर्वाना नक्कीच तारून नेतील, त्यामुळे कोणीही स्वामींच्या दर्शनाकरिता मंदिराकडे न येता सर्व स्वामी भक्तांनी आपल्या घरीच स्वामींचा पुण्यतिथी उत्सव साजरा करावा, असे आवाहन महेश इंगळे यांनी केले.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !