‘आय.एन्.एस्. विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर आग लागली !

आगीवर नियंत्रण मिळवण्यात नौदलाला यश

मुंबई – भारतीय नौदलाच्या आय.एन्.एस. विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर ८ मे या दिवशी सकाळी आग लागल्याची घटना घडली. युद्धनौकेच्या सेलर अ‍ॅकोमोडेशन कम्पार्टेमेंट म्हणजेच नौकेवर असणार्‍यांची रहाण्याची सोय असणार्‍या भागामध्ये ही आग लागली. या भागामधून आग आणि धूर बाहेर येऊ लागल्यानंतर अग्नीशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आणि तातडीने ही आग विझवण्यात आली.

ही आग अगदीच छोट्या स्वरूपाची होती. या आगीमुळे कोणतीही हानी झालेली नसून नौकेवरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.  या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून सध्या ही नौका कारवारच्या बंदरामध्ये आहे.