कोरोना नियमांचे उल्लंघन करून मशिदींमध्ये सामूहिक नमाजपठण !

हरिद्वार कुंभमेळ्याच्या सूत्रावरून हिंदूंवर टीका करणारे तथाकथित निधर्मीवादी आता कुठे आहेत ?

प्रतीकात्मक छायाचित्र

छतरपूर (मध्यप्रदेश) – कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असतांनाही छतरपूर येथील नौगावातील जामा मशीद आणि पलटन मशीद येथे सामूहिक नमाजपठण करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी २ मौलवींह २०० जणांवर गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वीही येथे अशा प्रकारे कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. तेव्हा पोलिसांनी केवळ चेतावणी देऊन त्यांना सोडले होते. (धर्मांध कधीही कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे त्यांना समजावण्यात वेळ दवडण्यापेक्षा त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)

मुन्नार (केरळ) येथे कार्यक्रमात सहभागी झालेल्या ४८० पाद्य्रांवर कारवाई !

काही दिवसांपूर्वी केरळमधील मुन्नार येथे एका वार्षिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या ४८० पाद्य्रांवरही कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेले १०० पाद्री नंतर कोरोनाबाधित झाल्याचे आणि दोघांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले होते.