‘लव्ह जिहाद’पासून वाचण्यासाठी सतर्क रहा ! – मंजुषा खाडये, हिंदु जनजागृती समिती

आपल्या भोळेपणाचा अपलाभ उठवून धर्मांध आपल्याला फसवण्यासाठी टपलेले आहेत. हिंदु महिला आणि युवती यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे पद्धतशीर प्रशिक्षण या धर्मांधांना दिले जाते.

‘हरित गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा ! – राहुल रोकडे, उपायुक्त, सांगली महापालिका

हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणपूरक आणि ‘इको फ्रेंडली’, तसेच हरित साजरा करावा, असे आवाहन करणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी असे आवाहन का करत नाही ?

दोडामार्ग तालुक्याचा ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रा’मध्ये समावेश करावा !

यापूर्वीही तालुक्यातील कळणे येथे जनतेच्या मोठ्या विरोधानंतरही खनिज उत्खनन चालू करण्यात आले. त्याचे दुष्परिणाम आता जनता भोगत आहे !

अतिरिक्त पोलीस महासंचालक पातळीच्या समकक्ष अधिकार्‍यांकडून विनायक मेटे यांच्या मृत्यूचा अहवाल मागितला जाईल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

विनायक मेटे यांचा मृत्यू घातपाताने झाला कि अपघातामुळे, याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि जनता यांच्या मनामध्ये कोणताही संशय राहू नये, यासाठी या घटनेच्या चौकशीचे दायित्व विशेष पोलीस पथकाकडे देण्यात आले आहे.

बीडमधील दुष्काळग्रस्त भागात पाणीपुरवठा करणार्‍या कंत्राटदाराकडून भ्रष्टाचार !

टंचाईच्या काळात पाणीपुरवठ्याच्या नावाखाली जनतेची लूट करणार्‍यांवर मागील वर्षभरात कारवाई का झाली नाही ? असे प्रकार अन्य जिल्ह्यात होऊ नयेत, यासाठी विभागाने सतर्क असणे आवश्यक आहे

नागपाडा (भायखळा) येथे गणपतीच्या मूर्तीवर अंडी फेकणार्‍या धर्मांधाला अटक !

पोलीस बंदोबस्त असतांनाही हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरला नाही, हे स्पष्ट होते. त्यांना कायद्याचा धाक वाटावा, यासाठी हिंदूंनीच आता पोलिसांवर दबाव आणणे आवश्यक !

जांब समर्थ (जिल्हा जालना) येथील श्रीराम मंदिरातून पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्तींची चोरी !

तीर्थक्षेत्राचा दर्जा असणार्‍या मंदिरातून इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी होणे हा हिंदु धर्मावरील मोठा आघातच होय !

हिंद महासागरात खरी सुरक्षितता प्रदान करणारा भारत हा एकमेव देश ! – श्रीलंकेच्या राष्ट्रपतींची स्वीकृती

हिंद महासागराला असुरक्षित आणि युद्धभूमी बनवू पहाणार्‍या चीनला कवटाळणार्‍या श्रीलंकेचा दुतोंडीपणाच यातून उघड होतो !

भूतकाळातील वक्तव्यांचा त्रास तुम्हाला नक्कीच भोगावा लागेल ! – अनुपम खेर, अभिनेते

जर तुम्ही भूतकाळात काही म्हणाला असाल, तर त्याचा त्रास तुम्हाला वर्तमान स्थितीत नक्कीच भोगावा लागेल, असे विधान अभिनेते अनुपम खेर यांनी केले.

पाकिस्तानी गुप्तहेराला देहलीत अटक

पाकिस्तान भारताच्या विरोधात कोणकोणत्या क्लुप्त्या लढवत आहे, हेच यातून स्पष्ट होते. अशा पाकला समूळ नष्ट केल्यासच सर्व समस्या सुटू शकतील, हे सरकारने जाणावे !