नागपाडा (भायखळा) येथे गणपतीच्या मूर्तीवर अंडी फेकणार्‍या धर्मांधाला अटक !

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – नागपाडा (भायखळा) येथे २१ ऑगस्टच्या रात्री गणपतीच्या मूर्तीचा आगमन सोहळा चालू असतांना धर्मांधांनी अंडी फेकून मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. धर्मांधांना अटक करण्यासाठी हिंदूंनी नागपाडा पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी अब्दुल करीम खाँ या आरोपीला अटक केली.

१. आगमन सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून पोलीस बंदोबस्त होता. असे असतांनाही नागपाडा येथे श्री गणेशमूर्तीचे आगमन होताच काही धर्मांधांनी
मिरवणुकीवर अंडी फेकायला प्रारंभ केला. यामुळे गोंधळ उडाला.

२. ‘मूर्तीची विटंबना करणार्‍या धर्मांधांना त्वरित अटक करावी’, अशी मागणी हिंदूंनी केली. धर्मांधांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत हिंदूंनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. हिंदूंच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंद केला. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • पोलीस बंदोबस्त असतांनाही हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरला नाही, हे स्पष्ट होते. त्यांना कायद्याचा धाक वाटावा, यासाठी हिंदूंनीच आता पोलिसांवर दबाव आणणे आवश्यक !