गोमंतकियांना जगासमोर मान खाली घालायला लावणार्‍या गोव्यातील हत्या, अमली पदार्थ आणि वेश्याव्यवसाय यांच्या घटना !

गोव्यातून होणार्‍या मानवी तस्करीचे प्रमाण देशात सर्वाधिक !

स्वदेशी वस्तू खरेदी करून देशाला बलवान बनवा ! – (निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

चिनी बनावटीचे साहित्य खरेदी करू नये. स्वदेशी वस्तू खरेदी करून देशाला आणखीन बलवान बनवा, असे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे.

मागील २ वर्षांत सोलापूर विभागातील १०० एस्.टी. गाड्या ‘स्क्रॅप’ !

आगारात प्रवासासाठी योग्य नसणार्‍या गाड्या महामंडळाच्या अनुमतीने स्क्रॅप करण्यात येतात. २ वर्षांत १०० गाड्या स्क्रॅप झाल्या असून ३० गाड्या मालवाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत.

पुणे शहरात अनंत चतुर्दशीला ‘निर्माल्य संकलन मोहीम’!

खरे तर फुले, पत्री यांसारख्या निर्माल्यामुळे पाणी प्रदूषित होण्याचा प्रश्नच येत नाही. निर्माल्यातील चैतन्य पाण्यात विसर्जित झाल्यामुळे पाण्याद्वारे त्या चैतन्याचा सर्वदूर स्तरावर लाभ होतो. निर्माल्य दान करण्यासाठी आवाहन केले जाते; मात्र नंतर ते कचर्‍यात, डंपरच्या गाड्यांत टाकले जाते. त्यात निर्माल्याचे पावित्र्य कसे रहाणार ?

अमरावती येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ४३५ किलो गांजा पकडला, ४ जणांना अटक !

७४ लाख २० सहस्र रुपयांचा माल जप्त !

महाराष्ट्रातील काही विवाह संस्था हिंदु मुलींच्या धर्मांतरासाठी साहाय्य करतात ! – नितेश राणे, आमदार, भाजप

महाराष्ट्रातील काही विवाह संस्था हिंदु मुलींच्या धर्मांतरासाठी साहाय्य करतात. केवळ २ सहस्र रुपयांमध्ये अवैध विवाह प्रमाणपत्र देण्यात येतात, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

राधाकृष्ण भक्त मंडळाचा श्री गणेश क्रूसावरील येशू ख्रिस्ताला मलमपट्टी करतांनाचा देखावा !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने श्री गणेशाचे अशाप्रकारे विडंबन केले जात आहे ! केवळ कल्पनाविलास म्हणून अशा कृती चुकीच्या असून असे करून आपण एकप्रकारे देवतेची अवकृपाच ओढावून घेतो !

प्रशासनाने श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी कायदाबाह्य भूमिका न घेता सकारात्मक भूमिका घ्यावी ! – कौशिक मराठे, इचलकरंजी

ज्या श्री गणेशाची आपण मनोभावे पूजा करतो, त्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन हे योग्य प्रकारे भाविकांची भावना जपून करणे आवश्यक आहे.

पालघर येथे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू !

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची भरधाव वेगातील कार पालघरमधील चारोटी येथे नदीवरील पुलाच्या कठड्याला आदळली. या अपघातात मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली.

धरणीचा पाडा (भिवंडी) येथे झोळीतून गरोदर महिलेला नेतांना बाळ दगावले

तालुक्यातील धरणीचा पाडा येथील भागात रस्ते नसल्याने गरोदर महिलेला मुख्य रस्त्यावर नेतांना त्या महिलेची प्रसूती झाली आणि तिचे बाळ दगावले. रस्ते नसल्याने या महिलेला ५ ते ६ गावकरी चादरीची झोळी करून नेत होते.