जगातील ५८ सहस्र ७०० मोठ्या धरणांपैकी बहुतेक धरणांचे आयुष्य संपत अल्याने जगाला धोका ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांच्या कॅनडामधील ‘जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थे’च्या ‘कालबाह्य होत असलेले जलसाठे : नवा धोका’ या अहवालानुसार यातील अनेक धरणांचे आयुष्यमान कधीच संपले आहे किंवा आगामी काही काळात संपणार आहे.

कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचे मंदिर तोडले जात असतांना पाक सरकार मूकदर्शक होते !

अशा टीका-टिप्पण्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक !

राष्ट्राध्यक्ष झाल्यावर बायडेन यांनी ‘पॅरिस करारा’मध्ये पुन्हा सहभागी होण्याचा घेतला निर्णय !

अमेरिका आता इस्लामी आणि आफ्रिकी देशांतील मुसलमानांना प्रवेश देणार

अमेरिकेकडून पाकपुरस्कृत लष्कर-ए-तोयबासह ८ आतंकवादी संघटना ‘विदेशी आतंकवादी संघटने’च्या सूचीत कायम !

अमेरिकेने लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटनेला ‘परदेशी आतंकवादी संघटने’च्या सूचीमध्ये कायम ठेवले आहे. तसेच पाकमधील ‘लष्कर-ए-झांग्वी आणि अन्य ६ जिहादी आतंकवादी संघटनांनाही  जागतिक आतंकवादी संघटनेच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या संसदेजवळ बंदूक आणि ५०० काडतूसे यांसह एकाला अटक

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा येत्या २० जानेवारीला शपथविधी सोहळा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी अमेरिकेच्या संसदेजवळ एका व्यक्तील बंदूक आणि ५०० काडतूसे यांसह अटक केली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव संमत

मेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव प्रतिनिधीगृहात चर्चेनंतर संमत करण्यात आला. महाभियोगाचा प्रस्ताव १९७ विरुद्ध २३२ मतांनी संमत झाला.

ट्रम्प यांच्या आता यू ट्यूब चॅनलवरही बंदी

ट्रम्प यांच्या यू ट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ ‘हिंसेला प्रोत्साहन देत आहेत’, असे कारण देत यू ट्यूबने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या यू ट्यूब चॅनेलवर तात्पुरत्या स्वरूपाची बंदी घातली आहे.

नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीपूर्वी अमेरिकेत सशस्त्र आंदोलनाची शक्यता ! – एफ्.बी.आय.ची चेतावणी

जगातील सर्वांत जुन्या समजल्या जाणार्‍या लोकशाही देशातील ही स्थिती भयावह आहे. यातून अन्य लोकशाहीप्रधान देशांनी बोध घेऊन सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !

डोनाल्ड ट्रम्प अणूबॉम्बद्वारे आक्रमणाचा आदेश देऊ शकतात ! – विरोधी पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांना संशय

ट्रम्प यांचा स्वभाव पहाता, अशी घटना घडलीच, तर आश्‍चर्य वाटायला नको !

डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमस्वरूपी बंद  

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी  संसदेमध्ये घुसून केलेल्या हिंसचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.