(म्हणे) ‘भारतातील मोदी सरकार ‘मुसलमान असणे’ हा गुन्हा ठरवत आहे !’

अमेरिकेतील महिला खासदार इल्हान उमर यांचा फुकाचा आरोप !

  • भारतात मुसलमानांवर कोणताही अत्याचार होत नसतांना जागतिक स्तरावर भारताची अपकीर्ती करण्यासाठीच अशा प्रकारचे आरोप करण्यात येतात, हे लक्षात घ्या !
  • भारतात गेली अनेक दशके काँग्रेसचे राज्य असतांना आणि आजही बंगाल, केरळ आदी राज्यांत हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होत असतांना इल्हान उमर त्याविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत !
अमेरिकेतील महिला खासदार इल्हान उमर

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतातील मोदी सरकार एखादी व्यक्ती ‘मुसलमान असणे’ हा गुन्हा ठरवत आहे, असा फुकाचा आरोप अमेरिकेतील महिला खासदार इल्हान उमर यांनी केला. त्यांनी भारताला अमेरिकेने दिलेल्या पाठिंब्याविषयी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. उमर यांनी ट्वीट करून ही टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, मानवाधिकारांचे हनन होत असतांना बायडेन प्रशासन मोदी सरकारवर टीका करणे का टाळत आहेत ?

उमर यांनी बायडेन प्रशासनाच्या उप परराष्ट्र सचिव वेंडी शर्मन यांना विचारले, ‘अमेरिकी सरकार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे समर्थन का करत आहेत ?’ यावर शर्मन यांनी म्हटले की,आमच्या प्रशासनाने जगातील प्रत्येक धर्म, प्रत्येक जात, प्रत्येक वंश, विविधतेच्या प्रत्येक गुणवत्तेच्या समर्थनासाठी उभे राहिले पाहिजे, याविषयी मी सहमत आहे.