‘जी २०’मधील काही बैठकांवर अमेरिका आणि ब्रिटन यांचा बहिष्कार !

रशियाचा सहभाग असल्याचे दिले कारण !

 ‘जी (ग्रूप) २०’ म्हणजे जगातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या २० देशांचा समूह !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अर्थमंत्र्यांच्या ‘जी २०’ या शिखर संमेलनातील काही बैठकांवर अमेरिका आणि युनायटेड किंगडम बहिष्कार घालेल, असे त्यांनी सांगितले आहे. या बैठकांना रशियाची उपस्थिती असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

अमेरिकेने ‘जागतिक स्तरावरील शक्तीशाली अर्थव्यवस्थांच्या सूचीतून रशियाला काढण्यात यावे’, असे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या ट्रेजरी सेक्रेटरी (अर्थमंत्री) जॅनेल येलेन यांनी अमेरिकेच्या वतीने रशियाविरोधी भूमिका मांडली.