न्यूयॉर्क (अमेरिका) येथे दोघा शिखांवर आक्रमण

एका आक्रमणकर्त्याला अटक

भारतातील मानवाधिकारावर चिंता व्यक्त करणार्‍या अमेरिकेने त्याच्याच देशात अशा प्रकारच्या घटना घडत असतांना त्या रोखण्याकडे अधिक लक्ष द्यावे ! – संपादक

न्यूयॉर्क (अमेरिका) येथे दोघा शिखांवर आक्रमण

न्यूयॉर्क (अमेरिका) – येथील रिचमंड हिल भागामध्ये २ शिखांवर आक्रमण करण्यात आले. आक्रमणकर्त्यांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने या आक्रमणाचा निषेध केला आहे.

दोघे व्यक्ती सकाळी फिरण्यास गेले असता ही घटना घडली. त्यांच्यावर काठीद्वारे आक्रमण करण्यात आले, तसेच पगडी काढण्यात आली. १० दिवसांपूर्वीही याच ठिकाणी एका शिखावर आक्रमण झाले होते.