संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशिया निलंबित !

  • युक्रेनमध्ये रशियाच्या सैनिकांनी मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा परिणाम !

  • मतदानाच्या वेळी भारत तटस्थ !

संयुक्त राष्ट्र परिषद

न्यूयॉर्क (अमेरिका) – रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याचा ठराव पारित केला. या ठरावाच्या बाजूने ९३, तर विरोधात २४ मते पडली आणि ५८ सदस्य तटस्थ राहिले. तटस्थ देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. वर्ष २००६ मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वापासून वंचित केला जाणारा रशिया हा दुसरा देश आहे.