अमेरिका आणि ‘नाटो’ देश युक्रेनच्या एकेक इंच भूमीचे रक्षण करतील ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका आणि ‘नाटो’ देश युक्रेनच्या एकेक इंच भूमीचे रक्षण करतील. पुतिन यांनी सध्या युद्धाच्या मैदानावर आघाडी मिळवली असली, तरी त्यांना याची किंमत चुकवावी लागेल.

अमेरिकेकडून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर वैयक्तिक निर्बंध

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि परराष्ट्रमंत्री सेरगे लाव्हरोव्ह यांना रशियाच्या युक्रेनमधील आक्रमणासाठी थेट उत्तरदायी धरत अमेरिकेने त्यांच्यावर वैयक्तिक निर्बंध घातले आहेत.

पुतिन हे जो बायडेन यांना ढोलसारखे वाजवत आहेत ! – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

ट्रम्प पुढे म्हणाले की, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाला नसता, तर हे सगळे घडलेच नसते आणि मी जर पुन्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो, तर हे अजिबात घडले नसते.

तिसरे महायुद्ध टाळायचे असेल, तर रशियावर निर्बंध घालणे अत्यावश्यक ! – अमेरिका

बायडेन पुढे म्हणाले की, आता जगाकडे दोन पर्याय आहेत. एक तर तिसरे महायुद्ध चालू करा आणि थेट रशियाच्या सैन्याशी आमने-सामने लढा किंवा जो देश (रशिया) आंतरराष्ट्रीय नियमच पाळत नाही, त्याला त्याची किंमत चुकवायला लावा.

जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येप्रकरणी ३ माजी पोलीस अधिकारीही दोषी

जॉर्ज फ्लॉयड साहाय्यासाठी याचना करत असतांना त्याकडे ‘जाणीवपूर्वक दुर्लक्ष’ करणे आणि चौविन यांच्या कृतींना साहाय्य केल्याचा ठपका टोऊ थाव, अलेक्झांडर क्यूंग आणि थॉमस लेन या ३ माजी पोलीस अधिकार्‍यांवर ठेवण्यात आला आहे.

अमेरिकेतील ४० विद्यापिठांमध्ये शिकवला जाणार जैन धर्मावरील अभ्यासक्रम !

यात जैन धर्मावर विद्यार्थ्यांना पीएच्.डी. करता येईल तसेच अहिंसेचे तत्त्व, सात्त्विक आहार यांवर विशेष अभ्यासक्रम असणार आहेत, अशी माहिती ‘फेडरेशन ऑफ जैन असोसिएशन ऑफ नॉर्थ’ या संस्थेने दिली आहे.

कोरोनाप्रतिबंधक लस निर्मितीमध्ये भारताने दिलेल्या योगदानाचे बिल गेट्स यांच्याकडून कौतुक

गेल्या वर्षभरात भारताने साधारण १०० देशांना कोरोनाप्रतिबंधक लसींचे १५ कोटी डोस उपलब्ध करून दिले आहेत.

रशिया-युक्रेन यांच्यातील तणाव न्यून करण्याला प्राधान्य द्यावे ! – भारत

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव वाढणे, हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. हा तणाव न्यून करण्याला त्वरित प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तातडीने बोलावलेल्या बैठकीत भारताने मांडली.

(म्हणे) ‘पत्रकार राणा अय्यूब यांचा छळ थांबवा !’ – संयुक्त राष्ट्रे, जिनेव्हा

संयुक्त राष्ट्रांकडून भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍या एका हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी महिला पत्रकाराला अशा प्रकारे पाठीशी घालण्याचा होणारा प्रयत्न त्याच्या प्रतिष्ठेला लज्जास्पद आहे !

रशियाने आक्रमण केल्यास युक्रेनला साहाय्य करू ! – जो बायडेन

आम्हाला संघर्ष नको आहे; परंतु रशियाने जर युक्रेनवर आक्रमण केले, तर आम्ही युक्रेनला साहाय्य करू. युक्रेनवर आक्रमण करणे चुकीचे असून विनाशकारी आणि अनावश्यक युद्धासाठी रशिया उत्तरदायी राहील अशी चेतावणी देणारे ट्वीट जो बायडेन यांनी केले.