पुतिन हे जो बायडेन यांना ढोलसारखे वाजवत आहेत ! – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

(डावीकडून) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर पुतिन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – माझ्या कार्यकाळात युद्ध झाले नाही. मी अमेरिकेला युद्धातून बाहेर काढले. कमकुवत राष्ट्राध्यक्षामुळे हे जग कायमच भीतीच्या सावटाखाली असणार आहे. व्लादिमिर पुतिन हे जो बायडेन यांना एखाद्या ढोलसारखे वाजवत आहेत, अशी टीका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यक्रमात बोलतांना केली. ट्रम्प पुढे म्हणाले की, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाला नसता, तर हे सगळे घडलेच नसते आणि मी जर पुन्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो, तर हे अजिबात घडले नसते.