अमेरिकेकडून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर वैयक्तिक निर्बंध

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन(डावीकडे)

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि परराष्ट्रमंत्री सेरगे लाव्हरोव्ह यांना रशियाच्या युक्रेनमधील आक्रमणासाठी थेट उत्तरदायी धरत अमेरिकेने त्यांच्यावर वैयक्तिक निर्बंध घातले आहेत. अमेरिकेने रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु, तसेच रशियाच्या सैन्यदलाचे प्रमुख व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्यावरही निर्बंध लागू केले आहेत.

१. अमेरिकेच्या अर्थ विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुतिन, लाव्हरोव्ह आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील रशियाचे सदस्य यांच्यावर निर्बंध लागू करून अमेरिका स्वतःचे मित्रराष्ट्र आणि भागीदार यांच्या साहाय्याने रशियाच्या युक्रेनमधील आक्रमणाला प्रत्युत्तर देत आहे.

२. अर्थ विभागाने कोणत्याही देशाच्या प्रमुखावर निर्बंध लादणे, ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. असे निर्बंध घातलेल्या नेत्यांच्या सूचीत पुतिन यांच्यासह उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन, बेलारूसचे अध्यक्ष अलेक्सांद्र लुकाशेंका आणि सीरियाचे अध्यक्ष बशल अल् असद यांचा समावेश आहे.