जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येप्रकरणी ३ माजी पोलीस अधिकारीही दोषी

  • अमेरिकेतील वर्णद्वेश !

  • अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येचे प्रकरण !

जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूप्रकरणी मिनियापोलिसच्या चारही पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत

मिनियापोलिस (अमेरिका) – येथे मे २०२० मध्ये जॉर्ज फ्लॉयड नावाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीची डेरेक चौविन या माजी पोलीस अधिकार्‍याने हत्या केली होती. त्यांना एप्रिल २०२१ मध्ये दोषी ठरवून साडेबावीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

तीन माजी मिनियापोलिस पोलीस अधिकारीही दोषी !

या प्रकरणाची अजूनही सुनावणी चालू असून यात अन्य ३ पोलीस अधिकार्‍यांनाही दोषी घोषित करण्यात आले आहे.

जॉर्ज फ्लॉयड साहाय्यासाठी याचना करत असतांना त्याकडे ‘जाणीवपूर्वक दुर्लक्ष’ करणे आणि चौविन यांच्या कृतींना साहाय्य केल्याचा ठपका टोऊ थाव (३६ वर्षे), अलेक्झांडर क्यूंग (२८ वर्षे) आणि थॉमस लेन (३८ वर्षे) या ३ माजी पोलीस अधिकार्‍यांवर ठेवण्यात आला आहे. या तिन्ही माजी पोलीस अधिकार्‍यांनी ‘फ्लॉयड यांना त्यावेळी वैद्यकीय सेवचे आवश्यकता आहे, हे लक्षात आले नाही’, असे न्यायालयाला सांगितले होते; मात्र न्यायालयाने हे अमान्य केले. ‘आरोपींना २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी’, अशी शिफारस फ्लॉयड यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणी शिक्षेविषयीची सुनावणी येत्या जून मासात करण्यात येणार आहे.