तिसरे महायुद्ध टाळायचे असेल, तर रशियावर निर्बंध घालणे अत्यावश्यक ! – अमेरिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (डावीकडे) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर पुतिन (उजवीकडे)

वॉशिंग्टन (अमेरिका) – तिसरे जागतिक महायुद्ध टाळायचे असेल, तर रशियावर निर्बंध घालणे अत्यावश्यक आहे, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले. रशियाची वृत्तसंस्था ‘तास’ने हे वृत्त प्रसारित केले आहे.

बायडेन पुढे म्हणाले की, आता जगाकडे दोन पर्याय आहेत. एक तर तिसरे महायुद्ध चालू करा आणि थेट रशियाच्या सैन्याशी आमने-सामने लढा किंवा जो देश (रशिया) आंतरराष्ट्रीय नियमच पाळत नाही, त्याला त्याची किंमत चुकवायला लावा. हे निर्बंध कसे असतील त्याचे नेमके स्वरूप आताच सांगणे कठीण आहे; पण मला वाटते हे आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत गंभीर निर्बंध असतील. रशियाला या वर्तनासाठी दीर्घकाळ मोठी किंमत चुकवावी लागेल.