कोरोनाप्रतिबंधक लस निर्मितीमध्ये भारताने दिलेल्या योगदानाचे बिल गेट्स यांच्याकडून कौतुक

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कोरोनाप्रतिबंधक लस निर्मितीमध्ये भारताने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आहे. भारतीय बनावटीच्या कोरोनाप्रतिबंधक लसी या अल्पदरात जगभरात उपलब्ध झाल्या आहेत, असे गेट्स यांनी सांगितले.

गेट्स पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात भारताने साधारण १०० देशांना कोरोनाप्रतिबंधक लसींचे १५ कोटी डोस उपलब्ध करून दिले आहेत. भारतीय दूतावासाने भारत-अमेरिका आरोग्य भागीदारीविषयी आयोजित केलेल्या एका ऑनलाईन कार्यक्रमात गेट्स बोलत होते.