चीनने रशियाला सैनिकी साहाय्य केले, तर चीनवर कारवाई करण्यास मागे-पुढे पहाणार नाही ! – अमेरिकेची चीनला चेतावणी

युक्रेनसमवेतच्या युद्धात चीन सैनिकी उपकरणांच्या माध्यमातून रशियाला साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाला पाठिंबा देणार्‍या कोणत्याही कृतीला चीन उत्तरदायी असेल.

विमान प्रवास १० टक्क्यांनी महागण्याची चिन्हे !

‘डेल्टा एअरलाइन्स’ या जागतिक विमान आस्थापनाचा दावा
युरोपचे सर्वांत मोठे विमान आस्थापन ‘र्‍यान एअर’नेही विमान भाड्यात वाढ होण्याचे संकेत दिले आहेत.

मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात अमेरिकेतील ख्रिस्ती धर्मप्रसारकाला अटक !

ख्रिस्ती धर्मप्रसारकांचे खरे स्वरूप ! असले वासनांध ख्रिस्ती धर्मप्रसारक म्हणे प्रेम आणि शांती यांचा संदेश समाजापर्यंत पोचवतात !

(म्हणे) ‘भारताने रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतले, तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील !’

अमेरिकेची भारताला अप्रत्यक्ष धमकी
स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करणार्‍या अमेरिकेने ‘भारताने काय करावे आणि काय करू नये’, हे सांगण्याची आवश्यकता नाही !

रशियाकडे केवळ १० दिवस पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक ! – अमेरिकेच्या माजी सैन्यदल प्रमुखाचा दावा

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला २० दिवस झाले असले, तरी ते अद्याप थांबलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर ‘रशियाकडे केवळ १० दिवस उरले आहेत. या १० दिवसांत युक्रेनने खिंड लढवली, तर रशिया आपोआपच चितपट होईल, असा दावा अमेरिकेचे माजी सैन्यदल प्रमुख बेन होजेस यांनी केला आहे.

इस्लामी टोळ्यांकडून काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेदच ! – अमेरिकेतील र्‍होड आइलँड संसदेची ठाम भूमिका

भारतातील काँग्रेस पक्ष काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाचे सत्य दडपतो, तर अमेरिकेतील एका राज्याची संसद काश्मिरी हिंदूंच्या बाजूने ठाम उभी रहाते. हे काँग्रेसला लज्जास्पद !

कॅनडातील कार अपघातात ५ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी ट्वीटरवरून या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली, तसेच ‘भारतीय दुतावासाकडून मृतांच्या जवळच्या व्यक्तींना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल’, असे आश्‍वासन दिले.

रशियाला साहाय्य केल्यास कठोर कारवाई करू ! – अमेरिकेची चीनला धमकी

जर रशियावर घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या संदर्भात चीनने रशियाला साहाय्य केले, तर चीनवर कठोर कारवाई करू, अशी धमकी अमेरिकेने चीनला दिली आहे.

जगभरात कोरोना महामारीचे १ कोटी ८२ लाख बळी ! – संशोधन

जागतिक स्तरावर बळी पडलेल्या ५९ लाख या एकूण मृतांच्या संख्येपेक्षा तीन पटींनी अधिक लोक मृत्यूमुखी पडले असल्याचे मत वॉशिंग्टन विद्यापिठातील संशोधकांच्या एका गटाने व्यक्त केले आहे.

अमेरिकेतील पाकचे राजदूत मसूद खान यांचे आतंकवाद्यांशी संबंध असल्याने त्यांची नियुक्ती रहित करा ! – अमेरिकेतील ३ खासदार आणि अ‍ॅटर्नी जनरल यांची मागणी

अशी मागणी का करावी लागते  ? अमेरिकेच्या प्रशासनाला आणि अन्वेषण यंत्रणांना हे लक्षात येत नाही का ? कि पाकप्रेमामुळे ते असे करण्यास कचरत आहेत ?