मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात अमेरिकेतील ख्रिस्ती धर्मप्रसारकाला अटक !

ख्रिस्ती धर्मप्रसारकांचे खरे स्वरूप ! असले वासनांध ख्रिस्ती धर्मप्रसारक म्हणे प्रेम आणि शांती यांचा संदेश समाजापर्यंत पोचवतात !

वासनांध ख्रिस्ती धर्मप्रसारक कॉरिगन क्ले

नूयॉर्क – हैती देशात शाळा चालू करून तेथील अनाथ मुलांना दत्तक घेणारा अमेरिकी ख्रिस्ती धर्मप्रसारक कॉरिगन क्ले याला मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात अटक केली आहे. अमेरिकेत क्ले याच्या विरोधात बाल शोषण आणि अश्‍लीलता या कलमांच्या अंतर्गत खटला चालवला जात आहे. लैंगिक शोषण केलेल्या मुलांपैकी एक क्ले यांचा मुलगा आहे, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्याची घटस्फोटित पत्नी शेली क्ले यांनी ही माहिती दिली आहे.

घटस्फोटित पत्नी शेली क्ले

क्ले याने जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत काही मुलाचे लैंगिक शोषण केले, असे आरोपात म्हटले आहे. शेली क्ले यांनी त्यांच्या मुलावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी अधिक काही बोलू शकत नाही’, असे त्या म्हणाल्या.