सरकारला माझा शिरच्छेद करायचा होता ! – पोप फ्रान्सिस यांचा अर्जेंटिना सरकारवर गंभीर आरोप

पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी – ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी अर्जेंटिना सरकारवर आरोप करतांना ‘काही वर्षांपूर्वी मी ब्युनोस आयर्स (अर्जेंटिनाची राजधानी) येथील आर्चबिशप (वरिष्ठ श्रेणीतील पाद्री) असतांना अर्जेंटिना सरकारला खोट्या आरोपावरून माझा शिरच्छेद करायचा होता’, असे म्हटले आहे.

‘वर्ष १९७० च्या सैनिकी हुकूमशाहीशी हातमिळवणी केल्याचा खोटा आरोप करून अर्जेंटिना सरकारला माझी हत्या करायची होती’, असे पोप  म्हणाले. त्यांचा हा आरोप इटलीतीन एका नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. फ्रान्सिस यांनी हे आरोप २९ एप्रिल या दिवशी हंगेरी दौर्‍यावर असतांना जेसुइट्समध्ये बोलतांना केले आहे. जेसुईट्स हा रोमन कॅथॉलिक चर्चच्या व्रस्तस्थांचा एक संघ आहे.