तर मी माझे कपडे विकून लोकांना गव्हाचे पीठ स्वस्तात उपलब्ध करून देईन ! – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

पुढील २४ घंट्यांत १० किलो गव्हाच्या पिठाच्या पिशवीचे मूल्य ४०० रुपयांहून खाली आणले नाहीत, तर मी माझे कपडे विकून त्या पैशांतून लोकांना गव्हाचे पीठ स्वस्तात उपलब्ध करून देईन.

(म्हणे) ‘भारताने जम्मू-काश्मीरला कलम ३७० पुन्हा बहाल करावे !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

‘भारत आता पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची सिद्धता करत आहे, त्यामुळे आता कलम ३७० चा विषय संपुष्टात आला आहे’, असे भारताने पाकला ठणकावून सांगितले पाहिजे !

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दबावामुळे पाक सरकारने ३० रुपयांनी वाढवले पेट्रोल-डिझेल यांचे दर

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ७ दिवस चर्चा केल्यानंतर पाकला ६ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाक सरकारने नाणेनिधीच्या सांगण्यावरून पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात प्रति लिटर ३० रुपयांनी (पाकिस्तानी रुपये) वाढ केली आहे.

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार

इम्रान खान समर्थकांनी मेट्रो स्टेशन जाळले

रशियाकडून तेल विकत घेतल्यावरून इम्रान खान यांच्याकडून पुन्हा एकदा भारताचे कौतुक

‘क्वाड’चा (भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांची संघटना) एक भाग असूनही भारताने स्वतःला अमेरिकेच्या दबावापासून अलिप्त ठेवले आणि जनतेला दिलासा देण्यासाठी अनुदानित रशियन तेल खरेदी केले.

श्रीलंकेप्रमाणे आता पाकिस्तानही आर्थिक दिवाळखोरीच्या वाटेवर !

पाकिस्तानची अर्थव्यवस्था झपाट्याने दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे. पाकच्या रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत साधारण २०० च्या जवळ पोचले आहे.

पेशावरमध्ये २ शीख उद्योजकांची हत्या !

नेहमी पाकची तळी उचलून भारताला वेठीस धरणारे खलिस्तानवादी पाकमधील शिखांच्या वारंवार होणार्‍या हत्यांसंदर्भात मूग गिळून गप्प बसतात ! यातून अशांना शिखांविषयी किती प्रेम आहे, हे उघड होते !

चिनी नागरिकांवरील आक्रमणांमुळे पाकमध्ये बलुची विद्यार्थ्यांचा छळ !

‘व्हॉइस फॉर बलूच मिसिंग पर्सन्स’ या मानवी हक्क संस्थेच्या म्हणण्यानुसार गेल्या ३ दशकांत ६ सहस्रांहून अधिक बलुची लोकांचे अपहरण झाले आहे. त्यांच्याविषयी आतापर्यंत काहीही माहिती मिळू शकलेली नाही. वर्ष २००९ पासून आतापर्यंत १ सहस्र ४०० बलूच नागरिकांचे मृतदेह आढळून आले आहेत.

अमेरिकेने षड्यंत्र रचून माझे सरकार पाडले ! – इम्रान खान

अमेरिकेने विरोधी पक्षांना हाताशी धरून षड्यंत्र रचून माझे सरकार पाडले. या षड्यंत्राचे समर्थन करणार्‍यांना पाकिस्तानच्या भविष्याची चिंता नाही.

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करणाऱ्या २२ जणांना प्रत्येकी ५ वर्षांचा कारावास

पाकचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी म्हटले होते, ‘कल्पना करा की, अपवित्र करणाऱ्या अशा घटनेमुळे हिंदूंना किती मानसिक त्रास झाला असेल ?’ या तोडफोडीचा पाकच्या संसदेतही निषेध करण्यात आला होता.