इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘क्वाड’चा (भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांची संघटना) एक भाग असूनही भारताने स्वतःला अमेरिकेच्या दबावापासून अलिप्त ठेवले आणि जनतेला दिलासा देण्यासाठी अनुदानित रशियन तेल खरेदी केले. स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या साहाय्याने आमचे सरकार जे साध्य करण्यासाठी काम करत होते ते भारताने केले, अशा शब्दांत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले. भारत सरकारने २१ मे या दिवशी केलेल्या पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात कपात करण्याच्या घोषणेचेही त्यांनी कौतुक केले.
इम्रान खान यांनी ट्वीट करतांना म्हटले, ‘भारत सरकार स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या साहाय्याने हे साध्य करण्यासाठी काम करत आहे. माझ्याही सरकारला लोकांना दिलासा देण्यासाठी अशीच कारवाई करायची होती; परंतु काही लोक सत्ता परिवर्तनासाठी बाहेरील दबावाला बळी पडले.’