पू. विनयानंदस्वामी यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

पू. विनयानंदस्वामी यांनी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली आणि आश्रमात चालू असलेले राष्ट्र, धर्म अन् आध्यात्मिक संशोधन यांविषयीचे कार्य जाणून घेतले. पू. स्वामींचा एक आश्रम आणि कालिमातेचे मंदिर आहे.

कोरोना लसीकरणाच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्या ! – आमदार नीतेश राणे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

देशात डिसेंबरअखेर कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी भाजपचे आमदार नीतेश राणे केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम घोषित

महाराष्ट्रात ३४ जिल्ह्यांतील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यानुसार १५ जानेवारी २०२१ या दिवशी मतदान होणार असून १८ जानेवारी २०२१ या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे.

अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यावरून महिलेला खाडीत फेकणार्‍याला पोलीस कोठडी

अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागावरून एका महिलेला तालुक्यातील वाडातर येथील पुलावरून खाडीत फेकणार्‍या तरुणाला न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

आयुर्वेदीय वैद्यांना शस्त्रक्रिया करण्यास अनुमती दिल्याच्या निषेधार्थ आयोजित ‘भारत बंद’मध्ये ‘आय.एम्.ए.’च्या गोवा विभागाचा सहभाग

केंद्राने पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आयुर्वेदीय वैद्यांना शस्त्रक्रिया करण्यास अनुमती दिल्याच्या निषेधार्थ आयोजित ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आय्.एम्.ए.) पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये ‘आय्.एम्.ए.’च्या गोवा विभागाने सहभाग घेतला.

बेंगळुरू येथे युवतीचे लैंगिक शोषण करून तिच्या धर्मांतर करण्यासाठी दबाव आणणार्‍या धर्मांधाला अटक

लग्नाचेे अमीष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण केल्यावर तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव निर्माण करणार्‍या २५ वर्षीय शबाब याला येथील जयनगर पोलिसांनी अटक केली.

गोव्यात अवेळी पाऊस

१० डिसेंबरच्या रात्री गोव्यात बहुतेक भागात अवेळी पाऊस पडला. यामध्ये जुने गोवे येथे ५ सें.मी., फोंडा आणि सांगे येथे प्रत्येकी ४ सें.मी., दाबोळी येथे ३ सें.मी, पणजी आणि काणकोण येथे २ सें.मी. अन् केपे येथे १ सें.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्हा पंचायतीची आज निवडणूक

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या एकूण ४८ मतदारसंघांसाठी १२ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केले जाणार आहे. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षपातळीवर लढवली जात आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मगोप, आप आदी महत्त्वाचे पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

गोव्यात दिवसभरात १०४ नवीन कोरोनाबाधित

गोव्यात सलग दुसरा दिवस कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. दिवसभरात १०४ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर १३० रुग्ण बरे झाले.

वाळपई येथील १० वी चा विद्यार्थी आणि कुजिरा, बांबोळी येथील शिक्षिका कोरोनाबाधित

कुडचडे येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील १२ वी इयत्तेतील विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याची घटना ताजी असतांनाच ११ डिसेंबर या दिवशी वाळपई येथील विद्यालयाचा १० वी इयत्तेतील एक विद्यार्थी आणि कुजिरा, बांबोळी येथील आणखी एक शिक्षिका कोरोनाबाधित आढळले आहेत.