पणजी, ११ डिसेंबर (वार्ता.) – १० डिसेंबरच्या रात्री गोव्यात बहुतेक भागात अवेळी पाऊस पडला. यामध्ये जुने गोवे येथे ५ सें.मी., फोंडा आणि सांगे येथे प्रत्येकी ४ सें.मी., दाबोळी येथे ३ सें.मी, पणजी आणि काणकोण येथे २ सें.मी. अन् केपे येथे १ सें.मी. पावसाची नोंद झाली आहे. राज्यात काही भागांत ११ डिसेंबर या दिवशी म्हणजे सलग दुसर्या दिवशीही अवेळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. अरबी समुद्रात अल्प दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात विशेषत: उत्तर गोव्यात अवेळी पाऊस पडण्याची शक्यता आहे; मात्र १२ डिसेंबरनंतर पावसाची शक्यता नाही, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
गोव्यात अवेळी पाऊस
नूतन लेख
- चेंबूर येथे आगीत ५ जणांचा मृत्यू !
- शेकडो ख्रिस्ती आंदोलनकर्त्यांचे मडगाव येथे ठिय्या आंदोलन : वाहतूक ठप्प
- पिंपरी-चिंचवड येथे संघाचा ६ ऑक्टोबरला विजयादशमी उत्सव !
- शारदीय नवरात्रीच्या निमित्त पुणे आणि चिंचवड येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथप्रदर्शन !
- थोडक्यात महत्त्वाचे
- ‘युनेस्को’च्या पथकाची प्रतापगडास भेट