
वाळपई, ११ डिसेंबर (वार्ता.) – कुडचडे येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील १२ वी इयत्तेतील विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याची घटना ताजी असतांनाच ११ डिसेंबर या दिवशी वाळपई येथील विद्यालयाचा १० वी इयत्तेतील एक विद्यार्थी आणि कुजिरा, बांबोळी येथील आणखी एक शिक्षिका कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे या सर्व विद्यालयांतील नियमित वर्ग रहित करण्यात आले आहेत. यापूर्वी कुजिरा, बांबोळी आणि उसगाव येथील विद्यालयांमधील प्रत्येकी एक शिक्षक कोरोनाबाधित आढळले होते. राज्यात १० आणि १२ वी इयत्तेचे नियमित वर्ग झाल्यानंतर शिक्षक अथवा विद्यार्थी कोरोनाबाधित होण्याच्या राज्यात एकूण ५ घटना घडल्या आहेत.
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासण्यासमवेत तंत्रज्ञानातील पालट आत्मसात् करावेत ! – डॉ. पी.के. सिन्हा
नागपूरच्या विद्यार्थ्याला दिले अबूधाबीचे परीक्षा केंद्र !
महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेसाठीही कठोर निर्बंध !
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
Monitoring Cells Illegal Conversions : धर्मांतर रोखण्यासाठी उत्तरप्रदेशातील विद्यापिठांत ‘कट्टरतावादविरोधी कक्ष’ स्थापन करणार !